The गडविश्व
भामरागड : आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात निवडणुक लढवण्यात आले. सदर निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे तीन सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहे यात सौ.कविता येतमवार,सौ.तेजस्वीनी मडावी, विष्णु मडावी असे तीन सदस्य निवडून आले आहे.
आज मतमोजणी झाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी येथे भेट घेवून चर्चा केले यावेळी लालसु आत्राम, श्रीकांत बंडामवार, जगदीश कोंकमूटटीवार, देवाशीश बिश्वास, मल्ला तलांडी, रामा मूलदा, पूनम येतमवार, प्रकाश मडावी, संतोष उसेंडी, गणेश तीरथागिरीवार, सचिन सिद्धमसिटीवार व आविस कार्यकर्ते उपस्थिति होते.