The गडविश्व
मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. टी २० सामन्यात क्लीन स्वीप दिल्यानंतर आता मोहालीमध्ये कसोटी सामन्यातही विजय मिळवला आहे. सर जडेजाच्या झंझावाती खेळीने टीम इंडियाला मोठे बळ मिळाले. तर आर अश्विननेही विक्रमी कामगिरी केली.
श्रीलंकेविरूद्धची पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. तब्बल २२२ धावांनी टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरू आहे. मोहाली इथे हा सामना खेळवला जात होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्याच इनिंगमध्ये 574 धावा केल्या. तर श्रीलंका संघाने दोन्ही इनिंगमध्ये मिळून टीम इंडियाला पराभूत करणे अशक्य झाले.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीला तोड नाही. पहिल्या इनिंगमध्ये रविंद्र जडेजाने ५ तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने २ आणि अश्विनने २ विकेट्स घेऊन विशेष कामगिरी बजावली आहे. टीम इंडियाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
1ST Test. India Won by an innings and 222 Run(s) https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022