The गडविश्व
गडचिरोली : १ ते ४ मे पासून पुणे येथे सुरु होणाऱ्या सब ज्युनिअर मुला व मुलींच्या राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राची भैरवी नरेंद्र भरडकर हिची ४६-४८ किलो वजन गटात निवड झाली आहे. या स्पर्धेत संघ व्यवस्थापक म्हणून कल्याणी महागणकर तर संघ प्रशिक्षक म्हणून पंकज मडावी यांची निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंच्या या स्पर्धेसाठी गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश मस्के, सचिन यशवंत कुरुडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड, क्रीडा अधिकारी संदीप खेब्रागडे, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार, रोहित विष्णोई यांनी शुभेच्छा दिल्या आहे. सदर खेळाडू गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक पंकज मडावी, महेश निलेकार, संतोष गैनवार, निखिल इंगडे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना संजय मानकर, प्रवीण मेश्राम, पारस राऊत, अक्षय कोवासे, दीपक खरवडे तसेच गडचिरोली बॉक्सिंग परिवाराने त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.