The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जन नायक राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथे रुग्णांना फळे बिस्किट वाटप तसेच वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू, फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे, मनसे जिल्हा सचिव डॉ. राजेंद्र गडपल्लीवार यांच्या वतीने घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक डोंगरे , स्वप्नील वाढई, जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष सतीश घाईत, प्रशांत कस्तुरे, विक्की सोनुले, आकाश मोहुर्ले, सुरज कांबळे, तुषार शेंडे, हर्षल बोरकुटे, हरीश वेलादी, आदी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.