मन्नेराजाराम गेरा परिसरातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार

203

– अतिदुर्गम मन्नेराजाराम गेरा येथील नागरिकांशी साधला संवाद

The गडविश्व
ता.प्र / भामरागड , १९ ऑक्टोबर : तालुक्यातील अतिदुर्गम मन्नेराजाराम गेरा येथील जनतेशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संवाद साधत परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या.
यावेळी मन्नेराजाराम गेरा परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या सिचन , रोजगार, रस्ते ,शिक्षण , बँक , पाणी असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या. परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यावर तोडगा काढू व या भागातील प्रत्येक गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी, लालसू आत्राम,नरेंद्र गरगम, श्रीकांत बंड मवार दसरत चांदेकर, रमेश झाडे,शामराव झाडे, दिनेश जुमडे,गणेश नागपूरवार, प्रभाकर मडावी,चिन्नू सडमेक, मनोज सिडाम,सूरज तलांडे,नंदा सडमेक,विक्की झाडे,राजू निलम,व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here