मल्टिप्लेक्स उद्योगात मोठा बदल : PVR आणि INOX चे विलीनीकरण होणार

352

– पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड असे असणार विलीनीकरनानंतचे नाव
The गडविश्व
मुंबई : मल्टिप्लेक्स उद्योगात एक मोठा बदल होणार आहे. पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) या दोन कंपन्यांनी आज रविवारी विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.
पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्सच्या (INOX) नव्या कंपनीचे संपूर्ण भारतात 1,500 पेक्षा जास्त स्क्रीन असणार आहेत. करारानुसार, अजय बिजली यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तर संजीव कुमार कार्यकारी संचालक असणार आहेत. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड असे विलीनीकरणानंतरच्या कंपनीचे नाव असणार आहे. त्यामुळे विलीनीकरणानंतर उघडणाऱ्या नवीन सिनेमागृहांचे नाव PVR INOX असे असणार आहे.
या दोन्ही कंपन्यांच्या बोर्डातील सदस्यांची आज रविवारी बैठक झाली. यामध्ये विलीनीकरणाच्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नवीन कंपनीचे अध्यक्ष पीव्हीआरचे संस्थापक अजय बिजली असणार आहेत.
विलीनीकरणामुळे ‘पीव्हीआर आयनॉक्स’ ही देशातील सर्वात मोठी चित्रपट प्रदर्शनाची कंपनी बनेल.
कोरोना महामारीमुळे या दोन्ही कंपन्यानी विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाकाळात या दोन्ही कंपन्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दुसरीकडे, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धेत उतरले आहेत. यासगळ्याचा PVR-INOX ला चांगलाच फटका बसत होते. त्यामुळेच या कंपन्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here