The गडविश्व
गडचिरोली : राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवले जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे निःशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ रुग्णालयांमधून उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरिबांसाठी आशेचे किरण नवे ठरत आहे.
एकत्रीत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये जिल्हा महिला व बाल रूग्णालय गडचिरोली हे रूग्णालयस सामविष्ट असून या रूग्णालयात योजनेअंतर्गत विविध ३४ प्रकाराच्या समाविष्ट स्पेशालिटी असून एकुण आजार ९९६/१२०९ इतक्या उपचार व शस्त्रक्रिया सेवा विनामुल्य समाविष्ट करण्यात येते. या योजनेमध्ये कॅन्सर, हृदयरोग, किडणीचे आजार, लहान मुलांचे गंभीर आजार, स्त्रीयांच्या गंभीर आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवजात शिशुंचे काविळ, ॲनमिया, थॅलेसेमिया अशा आजार असलेल्या रूग्णांनी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे.
या योजनेचे लाभ घेण्यासाठी पिवळे, केशरी, अन्नपुर्ण, अंत्योदय शिधापत्रीका तसेच मर्यादित कालावधीकरीता पांढरे राशन कार्डधारक कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. व रूग्णांचे सामान्य ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन्स, शाळेचे ओळखपत्र, यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अंगीकृत रूग्णालयात आरोग्यमित्र यांच्याशी संपर्क साधावा.
या रूग्णालयात आतापर्यंत ५० रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या दरम्यान या रूग्णालयातील अधिक्षक डॉ. दिपचंद सोयाम यांनी रूग्णांना खुप चांगले मार्गदर्शन करून त्यांचा समाधनपुर्वक उपचार या योजनेतून करून देत आहेत. व गोर गरीबांसाठी मदत करीत आहे. यासाठी त्यांनी सर्व सामान्य जनतेनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केल आहे. त्याकरीता अधिक माहितीसाठी जिल्हाप्रमुख लिलाधर धाकडे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती गोलीदार व सुपरवायझर लक्ष्मीकांत वासनिक या सर्वांशी सपंर्क साधावा.