महामंडळातर्फे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ बोनस जाहीर करा

431

– भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली : महामंडळातर्फे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ बोनस जाहीर करण्यात यावे अशी मागणी भ्रष्टाचार जनांदोलन समितीकडून जिल्हाधिकारी संजय मीणा यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
सन २०२१-२२ या सत्रामध्ये मध्ये ज्या गरीब शेतकऱ्यांनी शेतामध्ये राब राबून आपल्या शेतीमधून धान पीक घेतले व ते गावालगतच्या खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आले. त्या शेतकऱ्यांना हमीभावानुसार १९४० रुपये दराने रक्कम अदा करण्यात आली. जवळपास शेतकऱ्यांना एकरी उत्पादन घेण्यासाठी २१ ते २२ हजार रुपये खर्च येतो आणि शासनाकडून १९४० रुपये हमीभाव दिले जाते. त्यामुळे या अगोदर शेती ही १९४० रुपये मध्ये परवडत नसल्याने शासन बोनस रुपाने ७०० रुपये देत होता परंतु सन २०२१-२२ च्या हंगामात शासनाने बोनस रद्द केल्याने शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. शेती हा व्यवसाय तोट्यात चालत असल्याने या राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रकरण वाढत आहे याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडलेला आहे. यामुळे शेतकरी जगाचा पोशिंदा आणि या देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधले जाते. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा होत असेल तर त्याला म्हणावे तरी काय ? यामुळे शासनाने याची दखल घेऊन त्वरित येत्या आठ दिवसात बोनस जाहीर करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जर शेतकऱ्यांना बोनस न दिल्यास येत्या आठ दिवसात भ्रष्टाचार जनांदोलन समितीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास महाराष्ट्र समिती जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हा कार्याध्यक्ष योगाची कुडवे, जिल्हा सहसचिव पांडुरंग समर्थ, जिल्हा संपर्कप्रमुख फुलचंद वाघाडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रवींद्र सेलोटे, जिल्हा सदस्य प्रमोदजी होळी, तालुका सदस्य विलास भानारकर, तालुका सदस्य विश्वनाथ म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here