महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम महिला उद्योजकांना पाठबळ पुराव्यासाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम

241

The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम हा महाराष्ट्रातील महत्वाकांशी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना पांठिंबा देण्यासाठी एक विशेष उपक्रम आहे. ज्यामूळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम व शाश्वत उद्योगात रुपांतर करता येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,महाराष्ट्र राज्य,अमेरीकी दुतावास व अलायन्स फॉर क्रमर्शियलायझेशन अँड इनोव्हेंशन रिसर्च (एसीआयआर) यांच्या सयुक्त विद्यमाने महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबविण्याचे नियोजित केले आहे.हा कार्यक्रम प्रारंभिक टप्यातील उद्योगाचे नेतृत्व करणा-या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी आखला आहे.या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यांत येत असून ,निवडलेल्या 120 महिला उद्योजकतांना हे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रस्तावित प्रशिक्षणामध्ये स्ट्रार्टअपसाठी वित्त पूरवठा,गुंतवणूकदार आणि ग्राहकापर्यत आपली कल्पना कशी “पिच” करावी यावर देखील लक्ष केंद्रित केले जाईल, इच्छूक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी,अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 फेब्रूवारी असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण 8 मार्च पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरु होईल.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी :-
महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना,उद्योगांना प्रोस्ताहन देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे.या धोरणातील मुख्य उद्यीष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यवसायिक वातावरण निर्मिती करुन नवउद्योजकांना प्रोस्ताहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,स्टार्टअप्सना सक्षम करणे,नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे आदीचा समावेश आहे.या धोरणांची उद्यिष्टये साध्य
करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विविध योजना ,उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. 4 जानेवारी,2021 रोजी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची स्थापना करण्यांत आली,या कक्षाची प्रमुख उद्यिष्टे स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे,महिला उद्योगासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे,आवयश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे हे आहेत.इच्छूक महिला उद्योजकांनी सदर कार्यकमात सहभाग नोंदवून संकेतस्थ़ळावर अंतिम दिनांकापूर्वी अर्ज करावा असे आवाहन या कार्यालयाचे
कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी,व कर्मचारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here