– जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येनापुर चा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, ४ जुलै : जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येनापुर च्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक १५५२०९ विषय गडचिरोली शहरातील इंदिरानगर, कन्नमवार वार्ड, समुदायात घरोघरी जाऊन कुटुंबातील महिलांची भेट घेऊन महिलांसोबत चर्चा करून माहिती देण्यात आली. तसेच चामोर्शी तालुक्यातील भाडभीडी, तळोधी इ. ठिकाणी माहिती देण्यात आली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही महिलेस लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ किंवा मानसिक छळ, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेळछाळ अशा अडचणीत सापडलेल्या महिलांना झटपट मदत मागता यावी यासाठी राज्य महिला आयोगाची ‘155209’ हा टोल फ्री हेल्पलाइन कार्यान्वित आहे.
आपल्या परिसरात अथवा कुटुंबात महिलांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार होत असल्यास किंवा तुमच्यावर अन्याय, अत्याचार होत असेल तर टोल फ्री क्रमांक 155209 वर तुम्ही संपर्क करून मदत घेऊ शकता अशी माहिती महिलांना जनजागृतीच्या माध्यमातून सांगण्यात आली. सदर उपक्रम संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र बंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोलीच्या विद्यार्थीनी कु.पल्लवी मंगर, कु. वैशाली गेडाम, कु. पल्लवी कुनघाडकर यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली.