महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्यकार्यकारिणी गठीत

657

– राज्यअध्यक्षपदी सिद्धेश्वर मुंडेंची फेरनिवड, राज्यउपाध्यक्षपदी मुकेश नामेवार तर राज्यसचिवपदी मयुर कांबळे यांची बिनविरोध निवड

The गडविश्व
मुंबई, २४ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना हि संपुर्ण राज्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या हजारो संगणकपरिचालकांची एक मजबूत व लढाऊ संघटना असून या संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी मुदत संपल्याने राजीनामा दिला होता त्यामुळे संपुर्ण राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यानंतर काल २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथील मराठी मुंबई पत्रकार भवन येथील हॉल मध्ये राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हाप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात सिद्धेश्वर मुंडे यांची सर्वानुमते लोकशाही पद्धतीने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली तर गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मुकेश नामेवार यांची राज्यउपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर मयुर कांबळे (रायगड) यांची राज्यसचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे म्हणाले की राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे हा प्रश्न अंतिम टप्प्यात असून सर्व संगणक परिचालकांना न्याय मिळवून दिल्या शिवाय राज्य संघटना स्वस्थ बसणार नाही.
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना ही संपुर्ण राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांची संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून संगणक परिचालकांच्या न्याय व हक्कासाठी लढा दिला व देत आहे. संगणक परिचालक हे राज्यातील ६ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे कार्य करत असून त्यांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी असून या मागणीसाठी लढा सुरू आहे. या दरम्यान राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी मुदत संपल्याने राजीनामा दिल्याने संपूर्ण राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. मंगळवार २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे मराठी मुंबई पत्रकार भवनामध्ये झालेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षाच्या बैठकीत नव्याने राज्य अध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर मुंडे यांची फेरनिवड, राज्य उपाध्यक्ष म्हणून मुकेश नामेवार (गडचिरोली) यांची तर राज्य सचिवपदी मयुर कांबळे (रायगड) यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर राज्यसंघटनेच्या मंत्रालयीन बैठकीसाठी १० जिल्हाध्यक्षाची एक कोअर कमिटी तयार करण्यात आली त्यात सिद्धेश्वर मुंडे, मुकेश नामेवार, मयुर कांबळे या तीन पदाधिकाऱ्यासह जिल्हाध्यक्षामधून विजयकुमार वाघ (औरंगाबाद), निलेश खूपसे (बुलढाणा), संतोष कुडले (पुणे), सोमनाथ नवगिरे (सोलापूर), मनोज रनाळकर (नंदुरबार), प्रमोद चौधरी (जळगाव) व धनेश भोईर (पालघर) यांची निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत उर्वरित कार्यकारिणी मध्ये अनेक जिल्हाध्यक्षाची राज्य संघटनेच्या विस्तारात राज्यसंघटक म्हणून निलेश खूपसे (बुलढाणा) व संतोष कुडले (पुणे), राज्य संपर्क प्रमुख विजयानंद येडेकर (जालना), राज्य प्रसिद्धी प्रमुख संग्राम डिकळे (नांदेड), राज्य सोशल मीडिया प्रमुख सोमनाथ नवगिरे (सोलापुर), राज्य सल्लागार विजयकुमार वाघ (औरंगाबाद) व राकेश देशमुख (माजी राज्यउपाध्यक्ष), राज्य मार्गदर्शक प्रकाश कांबळे (कोल्हापूर) व मनोज रनाळकर (नंदुरबार), राज्यतांत्रिक प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी (लातूर), राज्य तांत्रिक सल्लागार शंकर पवार (सातारा), राज्यसंघटन समन्वयक किरण पाचोरे (सांगली) व ईश्वर माळी (धुळे), कोषाध्यक्ष वैभव एक्केवार (परभणी) व ओमप्रकाश तिबुडे (भंडारा), राज्य सहसंघटक आत्माराम घोटेकर (नाशिक), राज्य सहसोशल मीडिया प्रमुख राजेश कोयरे (अमरावती), राज्य सहकोषाध्यक्ष महेश पवार (ठाणे), राज्यसहसचिव मारोती चंद्रवंशी (हिंगोली), राज्य सहसंपर्क प्रमुख हरीश वेदरे (रत्नागिरी), राज्य सहसंघटन समन्वयक प्रमोद चौधरी (जळगाव), सहप्रसिद्धी प्रमुख प्रशांत मुळे (उस्मानाबाद), राज्य सहतांत्रिक प्रमुख धनेश भोईर (पालघर), राज्य सहतांत्रिक सल्लागार निलेश निर्मळ (अहमदनगर), राज्य सहसल्लागार अविनाश मातळे (अकोला), राज्य सहमार्गदर्शक गोकुळ राठोड (वाशीम) तसेच उर्वरित सर्व जिल्हाध्यक्ष हे राज्यकार्यकारिणीचे सदस्य असतील असे एकमताने ठरवण्यात आले.
यावेळी सर्वांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करून अभिनंदन केले तसेच राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे म्हणाले की आपला लढा अंतिम टप्प्यात असून सर्व जिल्हाध्यक्ष व नवनिर्वाचित राज्य पदाधिकारी यांनी सक्रिय राहून कार्य करावे. येत्या काळात सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे ही मागणी मान्य करण्यासाठी एकजुटीने लढा देऊन हा प्रश्न राज्य शासनाकडून विविध मार्गाने मान्य करून घेण्यात येणार आहे. यावेळी परत सर्व जिल्हाध्यक्ष यांनी राज्य अध्यक्षपदावर निवड करून संधी दिल्याबद्दल सिद्धेश्वर मुंडे व उपाध्यक्ष पदावर संधी दिल्या बद्दल मुकेश नामेवार व राज्य सचिव पदावर संधी दिल्याबद्दल मयुर कांबळे यांनी सर्व जिल्हाध्यक्षाचे आभार व्यक्त केले.
या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी सुमारे २४ जिल्हाध्यक्ष प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्या सर्वांच्या एकमताने सर्व निर्णय घेण्यात आले. काही अचानक आलेल्या अडचणीमुळे बैठकीसाठी न येऊ शकलेल्या ६ जिल्हाध्यक्ष यांनी लेखी पत्र पाठवून राज्य संघटनेच्या सर्व निर्णयाना पाठिंबा दिला. एकूण ३० जिल्हाध्यक्षाच्या मतानुसार हे सर्व निर्णय घेण्यात आले.

लोकशाहीचा मार्गाने पारदर्शक निवड पद्धतीने राज्यअध्यक्ष, राज्यउपाध्यक्ष व राज्यसचिवांची निवड

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेत पदांची निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने होते. तालुकाध्यक्ष व तालुका कमिटीची निवड तालुक्यातील संगणक परिचालक करतात. जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष मिळून जिल्हाध्यक्ष व जिल्हा कमिटीची निवड करतात तर राज्यअध्यक्ष, राज्यउपाध्यक्षची निवड राज्यसचिवांची निवड राज्यातील सर्व ३४ जिल्हाध्यक्षा मधून करण्यात येते. प्रत्येक जिल्हाध्यक्षाला या निवडणुकीत स्वतः उभा राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार ५ व्यक्तींची एक निवड समिती करण्यात आली त्यात निलेश खूपसे (बुलढाणा), विजयकुमार वाघ (औरंगाबाद), मनोज रनाळकर (नंदुरबार), शंकर पवार (सातारा) व धनेश भोईर (पालघर) ह्यांचा समावेश होता. त्यात अगोदर राज्यअध्यक्षपदाची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपद परत घेण्यास कोणीही इच्छुक नसल्याने सूचकांनी सिद्धेश्वर मुंडे यांचे सुचवले व अनुमोदकांनी अनुमोदन दिले असता सर्वांनी चर्चेअंती एकमताने बिनविरोध निवड केली. त्या प्रमाणेच राज्यउपाध्यक्ष मुकेश नामेवार व राज्यसचिव मयुर कांबळे यांची निवड करताना सुद्धा कोणीही इच्छूक नसल्याने बिनविरोध करण्यात आली.

माजी राज्य उपाध्यक्ष राकेश देशमुख यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला

राज्यउपाध्यक्ष राकेश देशमुख यांनी काही अडचणीमुळे स्वतःहुन राज्यउपाध्यक्ष पदावर काम न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनतर कमिटी बरखास्त झाल्यावर त्यांनी परत पद घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या ठिकाणी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मुकेश नामेवार यांची राज्यउपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामुळे आज पर्यंत अनेक वर्षे संघटनेसाठी मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांचा राज्यकमिटी कडून सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांना राज्य सल्लागार या पदावर काम करण्यासाठी त्यांची निवड केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here