The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ सप्टेंबर : स्थानिक श्री. जी. सी. पाटील मुनघाटे महाविद्यालय येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा चमुने भेट दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागा द्वारा या उपक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. विद्यार्थी व नागरिक यांच्यामध्ये सुप्त नवसंकल्पना व नवउद्योग कल्पनांचा अविष्कार व्हावा व त्यांना प्रत्यक्षात चालना मिळावी यासाठी या उपक्रमाद्वारा जिल्हास्तर विभाग स्तर व राज्यस्तरावर सादरीकरण करून पुरस्कार व सहयोग राशी वितरित करण्याचे कार्य शासन स्तरावर होणार आहे.
याप्रसंगी गणेश चिमणकर कौशल्य विकास अधिकारी, रुपेश तलवारे, अशोक बुर्रेवर, गणेश चिंताकुंटलवार यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय विभाग प्रमुख ज्ञानेश बनसोड यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.