महावितरण नागपूर परिक्षेत्र स्तरावरील विद्युत कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

315

The गडविश्व
नागपूर : नागपूर परिक्षेत्र, महावितरण नागपूर परिक्षेत्र स्तरावरील विद्युत कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकरिता १५ जून रोजी आयोजि करण्यात आली होती. यावेळी स्वतंत्र मजदूर युनियन अध्यक्ष जे.एस.पाटील, नागपूर परिक्षेत्र प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित होते. यावेळी विद्युत कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यावर चर्चा करण्यात आली.
दरम्यान कामगार विमाचे ओळखपत्र, आठवडी सुट्टी, २०१९ च्या आधीचे बोनस मिळाल्याची खातरजमा करून न मिळालेल्याना देण्यात यावी, सुरक्षा साधने, गणवेश व टूल किट उपलब्ध करून देण्यात यावे, २६जानेवारी, १मे, १५ आगस्ट व २ ऑक्टोबर पगारी रजा देण्यात यावी, प्रत्येक महिन्यात ७ तारखेला वेतन देण्यात यावे व न देणाऱ्याविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी व रजा रोखीकरणाची रक्कम देण्यात यावी तसेच प्रत्येक महिन्यात पगार स्लिप देण्याची मागणी केली.
या चर्चे दरम्यान विविध समस्यावर सकारात्मक चर्चा करून सदर समस्या सोडवणुकीसाठी संबंधित विभागांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात येईल असे नागपूर परिक्षेत्र प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी माहिती दिली.
प्रशासनाच्या वतीने ना.परिक्षेत्र सह. मुख्य. औ. संबंध अधिकारी मधुसूदन मराठे व मा.स सहा. महाव्यवस्थापक रुपेश देशमुख व संघटनेचे म.रा स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटना अध्यक्षडि.जी. तायडे, ना.श.प. सचिव बंटी बडगे व स्वतंत्र विद्युत कंत्राटी संघटना गोंदिया जिल्हा अध्यक्ष छोटू बोरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here