– पालखीचे तालुक्यात भ्रमण, देवटोक येथे होणार पालखिची सांगता
The गडविश्व
सावली : श्री पुण्य भुमी तिर्थक्षेत्र श्री मुर्केंडेश्वर.देवस्थान पंचकमेटी देवटोक (सिर्सी) येथून महाशिवरात्रि च्या पर्वावर 23 फेब्रुवारी पासुन पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर सावली तालुक्यातील जिबगांव, पेढगांव, उसेगांव,सीन्डोळा,आदी गावांना.दर्शन देत सदर.पालखीचा समापन सोहळा देवटोक येथे होणार आहे. . याचाच एक भाग म्हणून देवटोक येथून निघालेल्या शिव पालखीचे सावली नगराच्या स्मशानभूमी परिसरातील योगी संत नारायण बाबा मठात भव्य स्वागत करण्यात आले . यावेळी संत मुर्लीधर स्वामी महाराज, हरणघाट यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र जक्कलुवार .सचिव, नामदेव हजारे कोषाध्यक्ष, भास्कर पोहनकर, पत्रुजी चुदरी उपाध्यक्ष, राकेश गोलेपल्लीवार ग्रा. पं. सदस्य, गजानन पाल (,,सेवक) सुधीर महाराज, निलकंठ फाले पुजारी, सोबतच सामाजिक कार्यकर्ता नितीन गड्डमवार, अंकुश भाऊ शेंडे, सावली लोकमत दुधे ( पत्रकार ) बाबा मेश्राम ( पत्रकार ) प्रकाश.लोनबले (पत्रकार ) तसेच कार्यकर्ते संजय गेडाम, सोमा पा . मोटघरे, सतीश भाऊ कोतपल्लीवार, कवी पुल्लीवार, वासुदेव मोहूर्लै, सुनिल.नापे, मोरेश्वर मंगर, अलोक पोशेट्टीवार, शम कोहपरे, मंगल पिटारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात गेली दोन ते तीन वर्षापासून बंद असलेले मंदिर, यात्रा ,मज्जीद, जत्रा, सोबत लग्न कार्यक्रम व सामाजिक कार्यक्रम यावर कोरोनाची तिसऱी लाट थंडावल्यानंतर काहीसे निर्बंध हटवण्यात आले त्यामुळे अनेक सामाजिक, धार्मिक कार्याना सुरुवात झाली यातच विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान हे विदर्भातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे विदर्भासह अनेक जिल्ह्यातील भाविक तसेच परप्रांतीय भावीक यात्रे दरम्यान येत असतात, मात्र मार्कंडा यात्रेच्या पूर्वी सावली तालुक्यातील देवटोक(सिर्सी ) येथे मुर्केंंदेश्वर हे मारकदेश्वर यांचे वडील असल्याने मुर्केदेश्वर यांचे दर्शन घेवुन मार्कडा येथे जात असल्यामुले देवटोक देवस्थान सीर्सी मोठी जत्रा भरण्याचे महत्त्व आहे असे जुने जाणकार सांगतात त्यांमुळे देवटोक मंदीर परीसराचे महत्त्व लक्षात घेता परम पुज्य संत कार्तीक स्वामी महाराज यांचे परमशिष्य, हरणघाट हनुमान मंदीराचे.उद्धारकर्ते परम पुज्य.संत बाबा मुर्लीधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रिच्या पर्वावर.शिव पालखीचे आयोजन करण्यात आले. सदर पालखीची सुरुवात देवटक येथून सुरुवात झाली असून तालुक्यातील सावली, जिबगाव, बोथली, किसान नगर, कापसी, उपरी, सामदा पाथरी व्याहाळ, व्याहाड बु,हरांबा, लोढोली, साखरी, सिर्सी आदी गांवाना दर्शन देत हर हर महादेव या शिवशंभुचा जयघोष करत पालखीचा समापन सोहळा देवटोक(सिर्सी) येथे 1 व 2 मार्च.2022 ला प.पु मुर्लीधर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत.आहे., त्याचाच एक.भाग म्हणून सदर.पालखीचे उत्साहात स्वागत सावली नगरातील जागृत संत.श्री योगी नारायण बाबा मठात भव्य स्वागत करण्यात आले.