The गडविश्व
ता.प्रतिनिधी / धानोरा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात होणाऱ्या ४ एप्रिल २०२२ च्या महाजन आक्रोश मोर्चा व जाहीर
धानोरा तालुका येथून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या महाजन आक्रोश मोर्चाचे मुख्य संयोजक आमदार डॉ. देवराव होळी यांनी धानोरा तालुक्याच्या वतीने आयोजित मोर्चाचा नियोजनाच्या बैठकीत केले. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, रमेश भुरसे, तालुका महामंत्री विजय कुमरे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, माजी पंचायत समिती सभापती अजमन रावते, माजी पंचायत समिती सभापती अनुसया कोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य लताताई पुनाघाटे, नगरसेवक संजय कुंडू, नगरसेविका सौ प्रतीक्षा गुंडावर , नगरसेविका सौ वैशाली धाईत, विलास गावडे, गजानन मेश्राम, रसे , नरेंद्र भुरसे , जगदीश कन्नाके, श्रावण देशपांडे, सारंग साळवे, उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून राज्यात सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शेतकऱ्याच्या धानाला बोनस नाही , शेतकऱ्याच्या कृषी पंपाचे वीज कापली जात आहे २४ तास विजेची आवश्यकता असताना केवळ ८ तास नाममात्र विज देऊन वारंवार खंडित केली जात आहे. राज्यात गुंडा शाई, दडपशाही, महिलावर अत्याचार सुरू आहेत मात्र त्याकडे शासन गंभीर नाही राज्यातील अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत यातील काही मंत्री जेलमध्ये आहेत आणि मंत्र्यावर दहशतवाद्यांना पैसे दिल्याचे गंभीर आरोप आहेत परंतु त्यांना शासन निर्लज्जपणे समर्थन करीत आहे . या सर्व प्रकारामुळे राज्यातील सर्व जनता त्रस्त आहे. जनतेच्या मनातील हा महाजन आक्रोश असून या मोर्चाच्या निमित्ताने सरकारच्या कानापर्यंत जनतेचा आवाज पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकार प्रति आक्रोश व्यक्त करावा त्याकरिता महिला मजूर कामगार शेतकरी तरुण या सर्वांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी केले.
