The गडविश्व
गडचिरोली : कुटुंबामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिलांच्या बाबतीत संविधानाने हमी दिलेल्या महिलांच्या हक्काचे प्रभावी संरक्षण करण्याची आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतुद करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व नियम 2006 कायदा संपूर्ण भारतात लागु केला आहे. या अधिनियमातंर्गत मा. न्यायदंडाधिकारी हे पिडीत महिलेस त्रास देणारे पती किंवा इतर नातेवाईक यांचे कडून शारीरिक, लैंगिक, आर्थिक, मौखिक किंवा भावनिक अत्याचाराने पिडीत महिलांना निवास, सरंक्षण, आर्थिक लाभ, नुकसान भरपाई, मुलांचा ताबा व इतर आदेश काढून त्याद्वारे महिलेचे सांविधानिक अधिकार सुरक्षित करु शकतात. त्याकरीता सदर अधिनियमाच्या अंमलबजावणी करीता प्रत्येक तालुकास्तरावर शासनाने संरक्षण अधिकारी यांची पुर्णवेळ नेमणुक केलेली आहे. असे संरक्षण अधिकारी, क.ता. कुरखेडा यांनी कळविले आहे.
अधिक माहिती करीता पिडित व गरजु महिलांनी/व्यक्तींनी पुढीलप्रमाणे संपर्क साधावा : महिला व बाल विकास विभाग, संरक्षण अधिकारी यांचे कार्यालय (अभय केंद्र), स्थित- बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती परिसर ता.कुरखेडा -441209 जि, गडचिरोली
संपर्क क्रं.9022288505 ई-मेल -powcd2005@gmail.com