महिला दिना निमित्त खास भेट : मुंबई महिला पोलिसांना आता ८ तासांची असणार शिफ्ट

194

The गडविश्व
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. आज मंगळवारपासून त्यांना ८ तासांची शिफ्ट मिळणार आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. महिला कर्मचार्‍यांना घर आणि कामामध्ये चांगले संतुलन राखण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हे निर्देश पुढील आदेशापर्यंत मुंबईत लागू राहतील, असे अधिकाऱ्यांनी काल सोमवारी सांगितले.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीच या वर्षी जानेवारी महिन्यात राज्याचे कार्यकारी डीजीपी म्हणून २४ तास ड्युटी उपक्रमाला सुरुवात केली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीपीच्या आदेशानुसार महिला कर्मचाऱ्यांसाठी २ पर्याय आहेत. पहिल्या पर्यायामध्ये त्यांना सकाळी ८ ते ३, दुपारी ३ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशा तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल.
दुसऱ्या पर्यायामध्ये, शिफ्टच्या वेळा सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ड्युटीच्या वेळेबाबत महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही पर्यायांनुसार त्यांना ड्युटी सोपवावी, असे आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here