– चार वर्ष यशस्वी वाटचाल
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोलीचा लोकार्पण सोहळा 15 एप्रिल 2018 ला झाला व 16 एप्रिल 2018 पासून लोककल्याणासाठी रुग्णसेवा सुरु करण्यात आली. जिल्हा हा दुर्गम, आदिवासी व नक्षल पिडीत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आरोग्य सेवांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु जिल्हा महिला व बाल रुग्णालयाने यावर मात करून येणाऱ्या सर्व प्रकारच्या रूग्णांना गेले चार वर्ष यशस्वी सेवा दिली व त्यांची गरजही पूर्ण केली. सुरवातीपासूनच उपचाराकरीता जिल्ह्यातीलच नाही तर लगतच्या जिल्ह्यातीलही गरोदर व प्रसुती पश्चात माता, नवजात शिशु, तिव्र कुपाषित बालके, आणि इतर आजारांची 0 ते 12 वर्षातील बालके उपचाराकरीता गडचिरोली येथे भरती होत असतात. येथील 100 खाटांच्या या रुग्णालयात मासिक एकूण 550 ते 600 एवढ्या प्रसूती होतात. मागील वर्षात 01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत बाहयरुग्ण विभागात रुग्णांना यशस्वीरीत्या सेवा देण्यात आली. 3703 नवजात बालकांची जन्म नोंदणी झाली, एकूण ओपीडी 45604 इतक्या झाल्या, नियमित लसीकरण 23635 जणांचे केले, एनसीडी 108 जणांना, रक्तसाठा केंद्र एकूण रक्तसंक्रमण 3091, कोविड लसीकरण 27151, एकूण सोनोग्राफी 8689 त्यापैकी गरोदर मातांची सोनोग्राफी ही 6658 होती.
तसेच रुग्णालयात एकूण 14042 इतके रुग्ण उपचाराकरीता भरती झालेले. यात एकूण 6675 प्रसुती झालेल्यांपैकी साधारण प्रसुती 3396 व सिझेरियन शस्त्रक्रिया 3279 एवढी आहेत. कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळया पद्धतीनुसार प्रसुती प्रश्चात तांबी 1835, गर्भपातानंतर तांबी 23 लाभार्थी, प्रसुती पश्चात टॅबलेट छाया 203, स्त्री नसबंदी 551, लगतच्या आरोग्य संस्थेतून संदर्भीत केलेले रुगण 6497 सदर रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, नागपूरला संदर्भीत केलेले रुग्ण 1494, अति जोखमीच्या व गुंतागुत झालेल्या माता 6091 त्यापैकी 2217 अतिजोखमीच्या (गरोदर तसेच प्रसुती पश्चात मातांना) रक्त संक्रमण करण्यात आले. गर्भाशयाची शस्त्रक्रिया 46, Obstetric Hysterectomy 2, सदर रुग्णालयात शासनाकडून महिला व बालकांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ रुग्णापर्यंत पोहचविण्यात येते आहे. एस.एन.सी.यु.विभागात एकुण 2170 बालके भरती झाली त्यापैकी 1000 ग्रॅम ते 1.499 किग्रॅम दरम्यान वजनाची 107 बालके व 1000 ग्रॅमच्या खालची 7 अतिजोखमीच्या बालकांचे वजन वाढवून जीवदान देण्याचा प्रयत्न केला.
बाल रुग्ण विभागात भरती झालेली एकुण बालके 1707 आहेत. पोषण पुर्नवसन केंद्रामध्ये एकुण 252 बालके भरती झाली असुन 82 बालके 15 टक्के वजनामध्ये वाढ झालेली आहेत. डिईआयसी मध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके व विद्यार्थी यांना जन्मत: असणारे आजार, शारीरीक व बौध्दीक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भभणारे आजार, बालपणातील आजार, अपंगत्व, इतर आरोग्य तपासण्या व उपचार मोफत करण्यात येतात. त्यातील एकुण लाभार्थी 2760 आहेत. त्यापैकी वेगवेगळया आजारांची शस्त्रक्रिया झालेले 263 आणि मानसिक आरोग्य तपासणी व उपचारची 550 बालके आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत वेगवगळया आजारांची नोंदणी व मंजूरी असे एकुण 86 रुग्ण झालेले आहे. त्यापैकी वेगवेगळया आजाराच्या 78 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर रुग्णालयाचे रुग्ण सेवेचे मुल्याकंन करुन लक्ष्य कार्यक्रम अंतर्गत प्रसुती गृह व शस्त्रक्रिया गृह यांना 2019 मध्ये लक्ष कार्यक्रम अंतर्गत Labour Room Quality Improvement initiative राष्ट्रीय प्रमाणित झालेले आहे. त्याचप्रमाणे 2019-20 ला कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत रुग्णालयाला रुग्णांच्या सेवेबद्दल प्रोत्साहणपर बक्षीस देऊन प्रमाणित करण्यात आले. राज्यस्तरावरुन BFHI/Baby Friendly Hospital initiative Program कार्यक्रमाअंतर्गत प्री फायनल मुल्यांकन तसेच राज्यस्तरावरुन गडचिरोली जिल्हयात सदर रुग्णालयात नुरॉहेल्थ या अशासकीय संस्थेकडुन गरोदर व प्रसुती पश्चात माता व बालकांची विशेष काळजी घेण्याच्या हेतुने Care Campaign Program नव्याने सुरु करण्यात आलेला आहे.
या प्रमाणे रुग्णालयातील सर्व अधिकारी, विशेषतज्ञ, नर्सिग स्टॉफ व इतर संबंधित कर्मचारी रुग्णांना निंरतर मोफत आरोग्य सेवा पुरवित आहेत. तसेच गडचिरोली जिल्हयातील 6, चंद्रपूर जिल्हयातील 2 व तेलंगणा राज्यातील 1 असे 9 मातांना (Near Miss Maternal Case) मृत्युंच्या दाढेतुन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाचविण्यात मोलाची कामगिरी येथील सेवकांनी बजावली आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त रुग्ण संख्या असल्यामुळे शासनाने अतिरिक्त 100 खाटांचे एम.सी.एच. विंग.एस.एन.सी.यु.चे नुतनीकरणासाठी निधी दिलेला असुन बांधकाम सुध्दा झालेले आहे. यामुळे याही पेक्षा जास्त रुग्णांना उत्तम प्रतिच्या रुग्ण सेवा देण्यास मदत होईल.
येथील वैद्यकिय अधीक्षक डॉ.सोयाम यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की, या रुग्णालयात मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. कळत नकळत होणारी माता व बाल मृत्यु आपणाला टाळता येईल. रुग्णालयातील सर्व संबंधीत अधिकारी शर्तीने प्रयत्न करुन विषयतज्ञ व इतर कर्मचारी यांचेद्वारे मोलाचे सहकार्य करतील.