– नागपुर येथील तज्ञ डॉ. स्मृती रामटेके यांच्याकडून तपासणी व उपचार
The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्च येथील माँ दंतेश्वरी दवाखाना या ठिकाणी विविध ओपीडीचे आयोजन प्रत्येक महिन्याला करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संधिवात व हाडांचे विकार ओपीडीचे आयोजनही केले गेले आहे . या ओपिडीचे आयोजन येत्या शनिवारी २० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या ओपीडीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ते आवाहन करण्यात आले आहे.
या ओपीडीकरिता नागपुर येथील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. स्मृती रामटेके रुग्णांच्या तपासणी आणि उपचाराकरिता येत आहेत. संधिवाताच्या आजाराची अनेक लक्षणे आहेत जसे -सांध्यांना सूज येणे, सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा आणि वेदना, सूज आलेल्या ठिकाणी सांधे लालसर होणे, सांधे जखडणे, सांधे, स्नायू, हाडे यांच्या आसपास वेदना, मान आणि पाठदुखी,प्रदीर्घ ताप, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा येणे, वारंवार तोंडी फोड येणे, प्रकाश संवेदनशीलता. हात, पाय, चेहरा, छाती आणि/किंवा पोटावर त्वचा घट्ट होणे डोळे आणि तोंड कोरडे पडणे, थंड स्थितीत बोटे/पांजे निळे किंवा पांढरे होने,जिने चढल्याने स्नायू कमकुवत होणे. अश्या प्रकारच्या समस्या असलेल्या नागरिकांनी या ओपीडीचा लाभ घेऊन मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावा. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन माँ दंतेश्वरी दवाखाना या ठिकाणी आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.