The गडविश्व
ता.प्र /आरमोरी (नरेश ढोरे) : कासवी गट ग्रामपंचायत येथील रामपूर येथे स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. रामकृष्णजी मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी शिवसेनेचे आरमोरी विधानसभा संघटक राजूभाऊ अंबानी, सौ कल्पनाताई तिजारे जिल्हा नियोजन समिती सदस्य, उपसरपंच प्रवीणजी ठेंगरी, ग्राम पंचायत सदस्य उदारामजी दिघोरे, पुजाताई गुरणुले, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सुधाकरजी खरकाटे, वसंत समर्थ, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र भाऊ शेंडे, भाऊरावजी प्रधान माजी ग्राम पंचायत सदस्य, धनराज ठाकरे, हरीशजी खरकाटे, वासुदेव ठाकरे, धनराज वाटगुरे, मनोहर वाटगुरे, प्रेमादासजी ढोंगे, ग्राम पंचायत शिपाई रोषणजी भोयर ,विलास दाने अविनाशजी लिंगायत उपस्थित होते.