The गडविश्व
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागील संकटं काही कमी होताना दिसत नाहीय. गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या देशमुखांना एकामागेएक झटके मिळताना दिसत आहेत. अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण देशमुखांना जामीन मिळणे कठीण होऊन बसले आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने आज अखेर अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए कोर्टाने आज दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.