– तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्फतीने प्रशासनास निवेदन सादरनेत्रुत्वात
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील तलाठी साजा क्र.२ मधील शेतकऱ्यांनी आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे कि, सन २०१६-१७ पासूनचे नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन(सन्मान) मिळण्यात यावे, सन २०२०-२१ एकरी दहा हजार रू.प्रमाणे मंजूरी मिळणे, सन २०२२-२३ वर्षाचे धान खरेदी करण्यात यावी, धानाला प्रति किंवटल तीन हजार पाचशे रुपये हमी भाव देण्यात यावा, धान खरेदीस पुरेसा बारदाणा उपलब्ध करून देण्यात यावा, सन २०१८-१९ ते अद्यायावत बारदाणाचे रक्कम अदा करण्यात यावी, वन अतिक्रमण शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात यावे, सन २०२१-२२ वर्षाचे धान खरेदीचे बोनस देण्यात यावे, एकरी २० क्विंटल धान खरेदी करण्यात यावे इत्यादी आदि समस्या व मागण्यासदर्भात आज तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सह अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, माजी उपसरपंच अशोक येलमूले, पाटील मेश्राम, बाबूराव कस्तूरे, काशींराम गदेकर, हीरामन राऊत, महादेव शेंडे, दिलीप दुर्गे, शामराव चौधरी, आनंदराव कन्नाके, कैलाश दुर्गे, अशोक निकूरे, प्रभाकर वासाके, गनू शेंडे व शेतकरी उपस्थित होते.