-वेलगुर येते नवीन कृषि गोदाम
The गडविश्व
अहेरी – १ जुलै : तालुक्यातील वेलगुर येथे जिल्हा परिषद गडचिरोली बांधकाम विभागाकडून कृषि गोदाम मंजूर झाले असुन सदर गोदाम बांधकाम पूर्ण झाले असल्याने आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वेलगुर येथे कृषि गोदाम नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करवा लागत होता सदर बाब स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जि.प.अध्यक्ष यांच्या कडे मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सदर गोदाम मंजूर करण्यात आले व बांधकाम पूर्ण झाले असल्याने आज उद्घाटन सोहळा सम्पन्न झाला. गोदाम झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर, वेलगुर ग्रामपंचायत सरपंच किशोर आत्राम, उमेश भाऊ मोहुर्ले उपसरपंच ग्रामपंचायत वेलगूर, कीष्टापूर ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अशोक येलमुले, ग्रामपंचायत सदस्य करपेत ताई, तलांडे ताई, सडमेक ताई, नरेश मडावी, सुरेश येरमे, बंडू सिडाम, यास्वंत सिडाम, राजू येरमे, सुरेखाताई येरमे, किशोर करपेत, करपेत काकू, विनोद तलांडे, अनिल तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.