– ग्रामसभा राजपूर प्याच यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, ५ नोव्हेंबर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.राजपूर प्याच येथे अनिल गुरनुले यांच्या भव्य पटांगणात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाटि मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे, उपाध्यक्ष नरेश आत्राम, कोषाध्यक्ष शैलेश वेलादी, सचिव सुनील आत्राम, क्रीडा प्रमुख रामलू कुळमेत, पांडुरंग बोमकटीवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता ताई कुस्नके माजी जि प.सदस्य , छाया ताई प.स. माजी सदस्य, पिंटू भाऊ कुस्नाके माजी सरपंच आलापाली तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्तानी विराजमान होते , विशाल रापलिवार, संदीप भडके, जुलेक शेख तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते. विजय आत्राम सरपंच वेलगूर, उमेश मोहुर्ले, श्रीनिवास आलम, गणेश चौधरी महगाव, कार्तिक तोगम माजी उप सरपंच मरपल्ली, तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
Home Breaking News माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन