The गडविश्व
गडचिरोली : नगर परिषदेच्या माजी नागसेविका माधुरीताई खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने काल ३१ जानेवारी रोजी रात्रोच्या सुमारास दुःखद निधन झाले.
माधुरीताई खोब्रागडे या नगरपरिषदेच्या निवडणुकीत तीन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणाऱ्या एकमेव नगरसेविका होत्या. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई, पती, मुलगा, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.माधुरी खोब्रागडे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.