– गावास तालुका स्तरावरील आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार
– ग्रामपंचायत झाली पेपरलेस
The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कृत तसेच संपुर्णरित्या पेपरलेस झालेले गाव मानेमोहाळी हे गटारमुक्त करणार असल्याचे येथील सरपंच राजेंद्र कराळे यांनी संपल्प केला आहे.
मानेमाहाळी या गावातील लोकसंख्या ही 100 टक्के मागासलेली आहे. या गावास तालुकास्तरावरील आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित सुध्दा करण्यात आले आहे. परंतु गावात सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत कमकुवत असून पाणी वाहून नेण्याची गटार व्यसस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे 170 व्ययक्तीक शोष खडयांचे व 10 सार्वजनिक शोष खडयांचे उद्दिष्टे पुर्ण करून गाव गटारमुक्त करण्याचा संकल्प या गावान केलो आहे.
या गावात दारूबंदी, प्लास्टीक बंदी सारखे नवोपक्रम राबविण्यात आले तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेला सर्व भौतीक सुविधा उपलब्ध करून लहानशी शाळा डिजीटल शाळा करण्याकडे सुध्दा प्रयत्न आहे. मनरेगाच्या माध्यमातून गावात शास्वत विकासाचा वृध्दी दर वाढविण्यावर ग्रामपंचायतने भर दिला आहे. त्याचबरोबर पुढील एका वर्षात गावाचा कायापालट करण्याचा मानस ग्रामवासियांनी केला आहे.
स्मशानभूमीचे सौदर्यीकरण, गावात सौर पंप, हॅन्ड वाॅश सेंटर, हर घर पाणी, वैयक्तिक शोष खड्डे, सार्वजनिक शोष खड्डे, कंम्पोस्ट खड्डे, पांदन रस्त्याचे मुरमीकरन व खळीकरण, चौकाचे सौदर्यीकरण करून गावाचा संपुर्ण चेहरामोहराच बदलविणे हा प्राधान्यक्रम गावकऱ्यांनी ठरवलेला आहे.
15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय दिनी गावातीलच ज्येष्ठ नागरिकांना ध्वजारोहण करण्याचा मान मागाील 25 वर्षापासून दिला जात आहे हे मानेमोहाळी गावाचे विशेष.
नुकताच प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मासळ ते खांबडा 40 फुट रूंद रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता मानेमोहाळी येथून जात असल्याने गावाच्या चेहऱ्यात नक्कीच बदल होणार आहे. घन कचरा तथा गटारमुक्त गाव करून शाश्वत विकासाकडे झेपावणारा हा गाव पुढील वर्षात तालुक्यात एक आधारवड गाव बनेल हे हि तेवढेच निश्चित.