Ths गडविश्व
जयपूर, २९ जुलै : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग -21 लढाऊ विमान कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवार २८ जुलै रोजी रात्रो ९ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात विमानात असलेले दोन पायलट शहीद झाले आहे.
अपघात झाला तेव्हा संपूर्ण विमानाला आग लागल्याचे कळते . घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर विमानाचे अवशेष सुमारे १ किमी भागात विखुरले गेले. या विमानात असलेले दोनही पायलट शहीद झाले असून दोनही पायलटचे पॅराशूट उघडले नव्हते. अपघात एवढा भीषण होता की संपूर्ण परिसरात जोरदार स्फोट होऊन आगीच्या ज्वाळांचे लोट पाहून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सदर घटनेने अपघात झालेल्या भीमडा गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अपघातादरम्यान विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटर पर्यंत पसरला होता. सुदैवाने अपघात होतांना विमान गावाच्या बाहेर दूरवर पोहचले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.