– एकनाथ शिंदे यांनी पत्र ट्विटरला केले शेअर
The गडविश्व
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडल्यानंतर बंडखोर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला हे पत्र शेअर केले आहे. यामध्ये संजय शिरसाट यांनी आमदारांच्या भावना व्यक्त केल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झाले ते भावनिक होते. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरे कुठे मिळालीच नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारे हे पत्र लिहिले असल्याचे आमदारांनी सांगितले आहे.
ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022