– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झटका
The गडविश्व
मुंबई १ जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झटका दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेते पदावरून हटवले आहे. एक परिपत्रक जारी करत त्यांनी हा आदेश दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपासोबत युती करून नवीन सरकार स्थापन केले असून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे. बंड केल्यामुळे केल्यामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिपत्रक जारी करत त्यातून शिवसेनेच्या पदावरून हटवल्याचे कळविले आहे.
पक्षाविरोधी कारवाई केल्याचे कारण देत, त्यांना शिवसेनेच्या नेते पदावरून हटवले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
