The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली ९ ते १७ ऑगष्ट २०२२ या कालावधीत ” स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने सदर उपक्रमांची आज पासुन सुरुवात झाली. आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत जलधारा प्रभाग संघ येथे करण्यात आले.
“हर घर झेंडा” या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला भारतीय राष्ट्रध्वज सहजरित्या उपलब्ध व्हावा याकरीता जिल्हा परिषद, प्रशासनाकडुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, गडचिरोली येथे राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुने म्हणुन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र एम भुयार हे होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रविंद्र कमसे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ओंकार अंबपकर, कार्यकारी अभियंता (बांध) ललीत होळकर, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) अमित तुरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.व.बा.क) श्रीमती ए.के. इंगोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी पि. झेङ तुमसरे आदींसह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल भोपये व त्यांचे विभागातील सहकारी यांनी केले.