The गडविश्व
धानोरा : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री. जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश चुदरी, डॉ. हरीष लांजेवार ,डॉ. राजु किरमीरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. महान व्यक्तीने केलेल्या कार्याचा वसा घेऊन समाजात जीवन जगावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो प्रमुख प्रा. ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार डॉ. प्रियंका पठाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पंढरी वाघ, डॉ. विणा जंबेवार, प्रा. संजय मुरकुटे, डॉ .दामोदर झाडे, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार , प्रा .तोंडरे, प्रा. धवनकर, प्रा वाळके, प्रा भैसारे, श्री वाढणकर इ सहकार्य केले याप्रसंगी विद्यार्थी बर्याच प्रमाणात उपस्थित होते.