The गडविश्व
मुंबई, ३ जुलै : मुबंईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन नुकतेच निवृत्त झालेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या पाठिमागे आता ईडीचा ससेमिरा लागला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंचे ते निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे संजय पांडे यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे अशी माहिती आहे.
ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार संजय पांडे यांना येत्या मंगळवार ५ जुलैला दिल्लीतील ईडी कार्यालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजावला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे संजय पांडे यांना बजावण्यात आलेल्या समन्सने राज्याच्या राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येण्याची दाट शक्यता आहे.