– खासदार अशोक नेते यांची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जानेवारी २००३ पासून भूमीगत WCLची मुरमार खाण स्थिर आहे. सदर खाण ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या नियुक्त कोर आणि बंपर झोनच्या बाजूला येते. अगोदर पासूनच या खाणीला पर्यावरण व वनीकरण यांची वैधता प्राप्त आहे.त्यासाठी या खाणीला २००१ -२००२ मध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या MOEF & CC द्वारे ११ /०९/ २०१९ ही राजपत्र अधिसूचना जारी केल्यामुळे खंड ४.१ विषय खाणच्या आत आली आहे. सदर मुरपार खाणीमध्ये भूमिगत खाणकाम चालूू ठेवा अश्या मागणीचे निवेदन गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते यांनी रेल्वे,कोयला व खनिज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
मुरमार भूमिगत खाणमध्ये सुमारे ४५० मजुर काम करतात. दरवर्षी सुमारे ८० हजार टन कोळशाचे उत्पादन करते. आतापर्यंत कंपनीने ३२ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक केलेली आहे. या खाणीतील कोळसा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ला पाठविला जातो. त्यामुळे मुरमार खाण बंद केल्यास खाणीमध्ये काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची पाळी येईल. तसेच वीज उत्पादक निर्मितीला सुद्धा अडचण येऊ शकेल. तसेच मुरमार खाण भूगर्भातील असल्याने पर्यावरणावर व भूपृष्ठभागावर सुद्धा याचा परिणाम होत नाही. त्यामुळे, ईएसझेड च्या तरतुदीच्या कलम ४.१ अंतर्गत विचारात घेतले जावे. मुरमार भूमिगत खाण वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड कोळसा उत्खनन चालू ठेवावे अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
