– आविका संचालक मंडळाची पत्रकार परिषदेतुन मागणी – दस्ताऐवज गाहाळ केल्याबदल कार्यालयाला लावले कुलूप
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ सप्टेंबर :आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मुरुमगाव येथील संचालक मंडळाची सभा (२०२१- २२ ) ची खरीप हंगाम खरेदी केंद्र सुरु करण्याकरीता अंदाजे सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये घेण्यात आली. यात विविध ठराव घेण्यात आले. त्याचे पालन न करता आणि संचालक मंडळाला कोणत्याही कारभारात सहभागी करुण न घेता सचिव, केंद्रप्रमुख आणि प्रादेशिक उपव्यवस्थापक यांनी संगनमत साधून शेतकऱ्यांचा एकच सातबारा दोनदा ऑनलाईन केला, दोनदोनदा बिल काढून काढून शासनाला जमा करतो म्हणून पैसे धारणे यांनी वसुल केले परंतु शासनाला जमा केले नाही. वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावे खाते क्रमांक एकच टाकून येथील संस्थेत घोटाळा घडवून आणला त्यामुळे आम्हाला जबाबदार न धरता ज्यानी हा घोटाळा घडवून आणला त्यांनाच जबाबदार धरावे व संचालक मंडळावर लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व घोटाळा करणाऱ्या व्यक्ती वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आविका संस्था मुरुमगाव येथील संचालक मंडळाने धानोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतुन ५ सप्टेंबर ला केली.
धान खरेदी केंद्र सुरु करण्यापूर्वी सभा घेतली, सभेमध्ये ठराव घेण्यात आले. या सभेमध्ये दर महिन्याला सभा घेण्यात यावे, शेतकरी सभासद यांचेच धान्य घेण्यात यावे, विकलेल्या धानाचा हिशोब योग्य ठेवावा, वेळोवेळी डुंड्या तयार करुण पाठविण्यात यावे, तसेच दुसऱ्या केंद्राचे धान मुरुमगाव केंद्रामध्ये घेण्यात येऊ नये असाही ठराव संमत करण्यात आला. खरेदी केंद्रासाठी ओटा, शेड बनविण्याकरिता प्रतिक्विंटल १० रुपये घेण्यात यावे असा ठराव संमत झाला. संस्थेची दर महिन्याला सभा घेण्यात यावे जे शेतकरी धानाचे काटा करून केंद्रामध्ये आणतील ते सर्व कट्ट्याचे वजन करण्यात यावे असाही ठराव संमत करण्यात आला पण जेव्हा धान खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले तेव्हा संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास बोलाविले नाही. सचिव एल.जी धारणे आणि एस.आर.एम चौधरी उपप्रादेशिक व्यवस्थापक उपस्थित राहून उद्घाटन केले. असे आम्हाला सांगण्यात आले जेव्हा गोडाऊन मधून धानाचे पूर्ण उचल झाली तेव्हा ७ ऑगस्ट २०२२ रोजी सर्व सदस्यांचे सभा बोलाविण्यात आली व या सभेमध्ये सांगण्यात आले की खरिप हंगाम २०२१-२२ मध्ये खरीप २७ हजार ६५८ क्विंटल व रब्बी हंगामात ६ हजार १० क्विंटल एकूण ३३ हजार ६६८ क्विंटल धान खरेदी झाले आणि पूर्ण डिलिव्हरी होऊन ९८७८ क्विंटल धान्याचा घोटाळा झाला असे सांगण्यात आले. त्या घोटाळ्यामध्ये सर्वस्वी जबाबदार एलजी धारणे असून कोकोडे एम आय व केंद्रप्रमुख गुरुदास धारणे व ज्यांनी बिल व हंड्यावर सही करून पाठविले आहे ते जबाबदार आहेत. जेवढे धान खरेदी केंद्रामध्ये जमा झाले तेवढेच बिल व हुंडी मध्ये स्वाक्षरी करून पाठविले पाहिजे होते यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचाही हात असू शकते अशी शक्यता व्यक्त केली. परंतु एलजी धारणे यांनी स्वतः उभे होऊन सर्व सदस्यांनी हात झटकल्याने याची सर्वस्वी जबाबदारी घेतो असे सांगितले. ज्या सभेला एस .आर. एम. चौधरी उपव्यवस्थापक धानोरा व सोनवणे उपस्थित होते गुरुदास लहुजी धारणे याला केंद्रप्रमुख म्हणून कोणी नियुक्ती केली याच्याबद्दल आम्हाला माहीती नाही तसे सभेमध्ये सांगण्यात आले नाही व तसा ठरावही घेण्यात आलेला नव्हता, तसेच रब्बी धान खरेदी केंद्राचा ठराव नसतानाही रब्बी खरेदी केलीच कशी ? कोणाच्या आदेशाने झाले ? असा सवालही उपस्थित केला. ३ वर्षापासून शेतकऱ्याच्या बारदानाचे पैसे सुद्धा मिळालेले नाही ? तर हा पैसा गेला कुठे असा सवाल उपस्थित केला. ३० ऑगस्ट २०२२ ला संस्थेच्या सर्व संचालकांनी कार्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी त्यांना २०२०, २०२१,२०२२ या वर्षा मधले हमाल रजिस्टर, हुंडी बुक व बिल बुक मिळालेले नाही याबाबत केंद्रप्रमुख गुरुदास धारणे यांना विचारणा केली असता त्यांनी एस.आर. एम चौधरी यांनी तसेच आर एम कोठलावार गडचिरोली व संस्थेचे व्यवस्थापन एलजी धारणे यांनी गडचिरोलीला तपासणीसाठी घेऊन गेले आहे असे सांगण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख गुरुदास धारणे उपस्थित होते. आवीका संस्थेची कोणतीही परवानगी न घेता संस्थेचे कागदपत्र दुसऱ्याच्या हवाली कसे काय केले ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. प्रोसेडींग रजिस्टर वर न घेता व्यवस्थापकाची नेमणूक टीडीसी ने केली याची कल्पना संचालक मंडळास नव्हती धारणे हे दोन वर्षांपूर्वीच रिटायर झालेले होते. तर धारणे आणि चौधरी यांनी संगणमत करून धारणेची व्यवस्थाकपदी नियुक्ती करण्यात आली, एकाच शेतकऱ्याचे दोनदा बिल काढण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात मात्र एकदा धान टाकण्यात आले होते, दुसऱ्यांदा टाकलेल्या धरणाचे पैशाची उचल करून गुरुदेव धारणे यास देण्यात आले। शितल मनकु मडावी, भागीरम मार्गीया, कौरूबाई झीटको आचला कटेझरी, ओम महेश बहिरवार सदर व्यक्ती चे दोनदा बिल काढण्यात आले ते पैसे परत करण्यास सांगितले असता ते आम्ही शासनाला परत करतो असे सांगितले. संस्थेत मोठा घोळ करुण घोटाळा करणाऱ्या व्यक्तिवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेतुन करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला चंद्रशेखर बहिरवार उपाध्यक्ष, अजमल राऊत संचालक, मुरारी हलामी उपस्थित होते.