मुरुमगाव येथील गावकऱ्यांचे विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

233

– मागण्यां पूर्ण न झाल्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा , ९ सप्टेंबर : तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असलेली ग्रामपंचायत मुरुमगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास सबंधित पदाधिकाऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
५ सप्टेंबर २०२२ रोजी मुरुमगाव येथील पदाधिकारी व गावकरी यांनी आपले शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यां संदर्भात निवेदन दिले . निवेदनात मुरुमगाव ग्रामपंचायत अतंर्गत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, विद्युत विभाग चे कर्मचारीवर्ग मुख्यालयात गैरहजर, दररोज आवागमन करने, त्याच प्रमाणे मुरुमगाव येथील आदिवासी विविध काय॔कारी सोसायटीत खरिप हंगामाचे धान खरेदी केंद्रा मध्ये येथील व्यवस्थापक एल.जी.धारने व त्याचा मुलगा गुरूदेव धारने केंद्र प्रमुख, यांनी केलेल्या घोटाळ्या मूळे मुरुमगाव व परिसरातील शेतकरी वर्ग जे या सोसायटीत धान्य विक्री केलेले आहेत अशा ५० शेतकरी वर्गाला आता पर्यंत विकलेल्या धानाचे पैसे मिळालेली नाही, तरी गोरगरीब शेतकरी बांधवांना मिळायला पाहिजेत ही मुख्य मागण्या असून व त्याच बरोबर को-ऑपरेटिव बैकं ची शाखा सुरू करणे, आठवड्यात दोन वेळा नायब तहसीलदार यांची सेवा नियमित असने, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव याला ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करणे, मुरुमगाव येथे महाविद्यालयाची स्थापना करणे, स्व. रामचंद्र दखने विद्यालय येथे प्राध्यापकांचे व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या योग्य शिक्षणाची सोय, पटांगण, शौचालय, मूत्रीघर, पिण्याचे पाण्याची सुविधा, लाईट, फंखे याची सुविधा उपलब्ध नाही, मालेवाडा, मुरुमगाव, औधीं मार्ग चे डाबंरीकरन व पूल निर्माण कार्य करण्यात यावे, बि.एस.एन.एल.कार्यालय मुरुमगाव येथे ऑपरेटर ची नियुक्ती करणे, मूरूमगावं, हिरंगे मार्ग निर्माण कार्य खडीकरण करने बाबत मागण्या व ८ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत मुरुमगाव येथे ग्रामसभा व याची प्रोसेसिंग ठराव मंजूर करण्यात आलेली होती याच ठरावासह निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांना देण्यात आले.
सदर निवेदनाची प्रतिलिपी मुख्य काय॔कारी अधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली, तहसीलदार तहसील कार्यालय धानोरा, गटविकास अधिकारी पचांयत समिती धानोरा, पोलीस प्रभारी अधिकारी पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, या सबंधित विभाग व अधिकारी वर्गाला निवेदन दिले व मागणी पूर्ण न झाल्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी यावेळी मुरूमगावचे सरपंच शिवप्रसाद गवर्णा, उपसरपंच मथनुराम मलिया, ग्रा.पं. माजी सदस्य मुनिर शेख, गावकरी शिवनाथ टेकाम, धानोर पंस. माजी सभापती अजमन राउत, ग्रा.पं.सदस्य अभिजीत मेश्राम, वसंत कोलीयारा, ग्रा.पं.सदस्य तिवारी भोयर, ग्रा.पं.सदस्य राजेंद्र कोठवार, गावकरी बैसाखु कोटपरीया, नेघुराम कोठवार, क्रिपाराम भुरकुरे, पन्नेमाराचे सरपंच हरिश धुर्वे, ग्रा.पं. सदस्या चारूलता मार्गिया, ग्रा.पं.सदस्या गुलाबबाई मार्गिया, ग्रा.पं.सदस्या अंजुषा मैदमवार, ग्रा.पं.सदस्या क्रिष्णाबाई दयालुराम, ग्रा.पं.सदस्या रेखाबाई देहारी, ग्रा.पं.सदस्या मानकोबाई उईके, ग्रा.पं.सदस्या मदनजी बढई, भूपेंद्र मडावी होते. निवेदनाची प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , पोलीस अधीक्षक पोलीस मुख्यालय गडचिरोली, तहसीलदार तहसील कार्यालय धानोरा, गटविकास अधिकारी पंचायत समिती धानोरा, ,ठाणेदार पोलीस मदत केंद्र मुरूमगाव यांना पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here