The गडविश्व
ता.प्र / धानोरा : तालुक्यातील मुरुमगाव येथील महसूल मंडळ संकूल कार्यालय सध्या विविध समस्या चे माहेरघर बनलेले आहे. मुरुमगाव ग्रामपंचायत हे धानोरा तालुक्यातील क्र. १ ची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे./मात्र याकडे शासन व प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे.
मुरुमगाव येथे बऱ्याच वर्षांपासून शासनाकडून करोडो निधी खर्च करून महसूल संकूल मडंळ कार्यालय इमारत निर्माण करण्यात आली. या इमारतीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले. परंतु सदर इमारतीचा उपयोग आज पर्यंत करण्यात आलेला नाही. जेव्हापासून हि इमारत तयार करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत एकही अधिकारी व कर्मचारी येथील मुख्यालयामध्ये वास्तव्य केलेले नाहीत व आजही मुख्यालयामध्ये कोणी राहत नाहीत. तसेच या महसूल संकूल मडंळ कार्यालयामध्ये विद्युत प्रवाह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, फंखे नाही, लाईट ची सुविधा नाही, कपाट, दरवाजे नाही, खिडकी नाही, बसायला टेबल खुर्ची नाही. कर्मचारी वसाहतीत जर्जर होऊन भूतबगंल्यामध्ये बदल झालेले पहायला मिळते. येथे कोणीच राहत नसल्याने याची देखरेख करणारा कोणीच नाही, हप्त्यातून एक दिवसा करीता किवा दोनच दिवस तलाठी सकाळी येतात व संध्याकाळपर्यंत परत निघून जातात. त्यामुळे येवढ्या मोठ्या इमारतीकडे शासन दुर्लक्ष करीत असून करोडो रुपयाची इमारत धुळखात पडलेली दिसुन येत आहे.