मुलांच्या लसीकरण नाव नोंदणीला भरघोस प्रतिसाद : दोन दिवसात ८ लाखांच्या वर नोंदणी

315

THE गडविश्व
वृत्तसंस्था / मुंबई : आज ३ जानेवारी पासून देशभरात १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोविन (CoWIN) अँप आणि पोर्टलवर १ जानेवारी पासून नोंदणी सुरु झाली आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. १ जानेवारी रोजी जवळपास अडीच लाखांहून अधिक मुलाची नोंदणी झाली होती तर कालपर्यंत जवळपास ८ लाखाच्या जवळपास नोंदणी करण्यात आली. त्यात आज आणखी भर पडली आहे.आज सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८ लाख ७ हजार ५७५ मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर प्रसाशनाकडून त्याची पूर्ण करण्यात आली आहे.
ज्या मुलांचा जन्म २००७ किंवा त्यापूर्वी झाला आहे अशी मुलं लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.

नोंदणी करण्याकरिता कोविन अँप अथवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करू शकता

https://www.cowin.gov.in/home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here