– अनेक गावांचा तुटला संपर्क
The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑगस्ट : जिल्हयात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरात सर्वाधीक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना-जेप्रा मार्गावरील रस्ता हुन गेला आहे. यामुळे त्याठिकाणी मोठे भागदाड पडल्याने अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
दिभना-जेप्रा मार्गावरील रस्ता गेला वाहून
– मूसळधार पावसाने #गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती,अनेक गावांचा संपर्क तुटला
-जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना-जेप्रा मार्गावरील रस्ता अशाप्रकारे वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे.#gadchiroliflood pic.twitter.com/h2Otl5z2jL— THE GADVISHVA (@gadvishva) August 9, 2022
जिल्हयात हवामान विभागामार्फत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने अनेक मार्ग विस्कळीत झाले असून काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशातच पोर्ला परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा-दिभना मार्गावरील एका नाल्या नजीकचा रस्तहून गेल्याने मोठे भगदाड तयार झाले आहे. यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होऊन मार्ग बंद झाला आहे.