The गडविश्व
गडचिरोली, १२ सप्टेंबर : १ ते ७ सप्टेंबर हा आठवडा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अंर्तगत विविध गावांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात आला. याच मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
मानवी जीवनाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आवश्यक अशी पोषणाची गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणासाठी समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. तसेच Contest followed by Exhibition on Best Nutrition Practices,Fitness and Nutrition Champion,My Fitness My Responsibility,School Ki chan Garden इत्यादी क्रियाकल्पा मधून चुकीच्या खाण्याच्या सवयी वर मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांना एनएम, आशा वर्कर, शिक्षक व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे युवा मार्गदर्शक यांच्या माध्यमातून पोषण आहारावर समुपदेशन करण्यात आला.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोलीचा हा कार्यक्रम चामोर्शी तालुक्यातील २३ गावात साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी गावातील युवक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती,मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे युवा मार्गदर्शक आणि इतर प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर, चामोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक मा. योगिता सातपुते मॅडम व युवा मार्गदर्शन प्रफुल निरुडवार, रोशन तिवाडे, दिपक ढपकस, सोनी शिउरकार, पंकज शंभरकर व अश्विनी उराडे आणि समुदाय युवा नेते यांच्या सहकार्यतून पारपडला.