The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अंतर्गत २३ सप्टेंबर २०२२ ला गट साधन केंद्र चामोर्शी येथे मुख्याध्यापक व शिक्षकांचे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमात मॅजिक बस संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. मॅजिक बस हि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा पद्धतीने काम करते आणि विद्यार्थ्यांच्या सुदृढता व पोषण आहार, आरोग्यासाठी चांगल्या सवई आणि त्यांच्या जीवन कौशल्य कशा पध्दतीने रुजवण्याचे कार्य करते हे सत्र प्रात्यक्षिक शिक्षकांसोबत घेऊन त्याचे महत्व पटवून देण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मॅजिक बस संस्थेच्या कामाचे महत्त्व प्रत्यक्ष पटवून देण्यात आले. मॅजिक बस च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या २३ गावातील जिल्हा परिषद व खाजगी शाळा अशा एकूण ३३ शाळातील ५६ मुख्याध्यापक व शिक्षकांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ट जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, चामोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक योगिता सातपुते तसेच जिवन कौशल्य अधिकारी नागेश नेवारे आणि युवा मार्गदर्शक प्रफुल निरुडवार,रोशन तिवाडे, सोनी शिउरकर, दिपक ढकस, अश्विनी उराडे, पंकज शंभरकर यांच्या सहकार्यतून पार पाडण्यात आला.