मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तर्फे मुख्याध्यापक व शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

278

The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तर्फे मुख्याध्यापक व शिक्षकांची एक दिवशसीय कार्यशाळा नुकतीच २७ सप्टेंबर ला गट साधन केंद्र गडचिरोली येथेसंपन्न झाली.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्हात मागील दोन वर्षांपासून १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी “खेळाच्या माध्यमातून विकास व विषयात्मक शिक्षण” सत्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवित आहे.या कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य,संघकार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे,स्व – व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण – संख्या ज्ञान व भाषा ज्ञान आदी क्षेत्रावर काम करीत आहे.
कार्यशाळेत मॅजिक बस संस्थेच्या कार्याची माहिती सोबतच मुख्याध्यापक व शिक्षकांचे अनुभव घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅजिक बस हि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा पद्धतीने काम करते आणि विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य, संख्या व भाषा ज्ञान कशा पध्दतीने रुजवण्याचे कार्य करते हे सत्रद्वारे प्रात्यक्षिक शिक्षकांसोबत घेऊन त्याचे महत्व पटवून देण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांनी सत्राच्या माध्यमातून मॅजिक बस संस्थेच्या कामाचे महत्त्व प्रत्यक्ष पटवून देण्यात आले. तसेच कार्यात्मक इंग्रजी या सत्राला यशस्वीरीत्या मुलांना पोहचवता येईल आणि त्याचा मुलांना काय फायदा होईल याबद्दल या कार्यशाळेत सांगण्यात आले. सदर कार्यशाळा ही गडचिरोली येथील गटशिक्षणाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रशांत लोखंडे यांनी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्थेविषयी संपूर्ण माहिती दिली व सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मार्गदर्शनात सांगितले.
या एक दिवसीय मॅजिक बस च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १७ गावातील जिल्हा परिषद व खाजगी शाळा अशा एकूण शाळातील ३४ मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गट साधन कर्मचारी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, गडचिरोली तालुक्याचे तालुका समन्वयक देवेंद्र हिरापूरे, चामोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक योगिता सातपुते तसेच जिवन कौशल्य अधिकारी लेखाराम हुलके, देवाजी बावणे, स्नेहल डांगे आणि विषय शिक्षिका रीना बांगरे, बारुबाई शेडमाके, विषय शिक्षक सूरज खोब्रागडे यांच्या सहकार्यातून पार पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here