THE गडविश्व
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवनी या गावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य बालिकादिन विविध ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत मॅजिक बस सत्रात भाग घेणाऱ्या मुलांसाठी वेशभूषा, गितगायन, संगीत खुर्ची(मार्कर), भाषण स्पर्धा व पोता रेस आदी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम साजरा करतांना सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून गावात ज्ञाणोत्सव रॅली काढून घोषवाक्य देत मुलांनी शिक्षणाचा संदेश दिला. रॅलीनंतर शाळेत पाहुणे मंडळींचे स्वागत करण्यात आले, त्यांनतर भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गितगायन स्पर्धा, संगीत खुर्ची(मार्कर) व पोता रेस या स्पर्धा टपाटप्प्यानी घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेमध्ये एकूण ५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्व विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे शा.व्य.स. अध्यक्षा सौ.सुनीताताई भैसारे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख बारसिंग, आरोग्य सेविका वाटे, आरोग्य सेविका आसमवार, मुख्याध्यापक बांबोळकर, सोरते व आशावर्कर उंदिरवाडे, आत्राम, शेख, बल्लमवार, सर्व बालपंचायत मंत्रिमंडळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली देवेंद्र हिरापूरे व जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे यां यांचे सहकार्य लाभले.