-भामरागड तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली : भामरागड येथे दारु व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका समितीची बैठक तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मोठ्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर, पोलिस निरीक्षक किरण रासकर, नगरपंचायतचे आशिष बारसागडे, मुक्तिपथ कार्यकर्ता तथा तालुका समिती सचिव आबिद शेख, भूमी अभिलेख उपअधिक्षक गजानन जीवतोडे, तालुका कृषी अधिकारी अमोल नेटके, जिजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सिताराम मडावी, रामलू सडमेक उपस्थित होते.
दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये शहर पातळीवर एक पथक गठित करुन दर महिन्याला सर्व पानठेले व किराणा दुकानधारकांना सुगंधित तंबाखू विक्री बंद करण्याबाबत सूचना देऊन तपासणी करणे. शासकीय कार्यालयातील दारुचे व्यसन असलेल्या व्यक्तींना उपचारासाठी क्लिनिकमध्ये रेफर करणे, प्रत्येक दोन महिन्याने तालुका समितीची बैठक घेऊन दारू व तंबाखू नियंत्रण हेतू कोणत्या विभागाने काय काम केले याबाबत आढावा घेणे. आदी मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.