– डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीचा निर्णय
The गडविश्व
सोलापूर : येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १ रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीचे पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास पूजा व बुद्धवंदना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि विश्वस्त समितीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून बुद्ध वंदना देण्यात आली. सोलापुरातील मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना देण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसागर लोटला होता.
सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या इंधनाच्या दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरातील डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध करण्यात येणार आहे.