THE गडविश्व
कुरखेडा : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हे सध्याच्या स्पर्धात्मक युगात अत्यंत महत्वाचे आहे, आणि बऱ्याच वर्षांपासून नेहरू युवां केंद्र युवकांचा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आणि म्हणूनच युवतींचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या दृष्टीने कांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य नेहरू युवां केंद्र तर्फे डी. के महिला महाविद्यालय कुरखेडा येथे विद्यार्थी विकास मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पल्लवी एल. तागडे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अरुणा नि. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवां केंद्रातर्फे जयंती निमित्य प्रश्नमंजुषा घेण्यात आली यांच्या आयोजित विद्यार्थी विकास मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय युवां स्वयंसेवक जयश्री प्रधान यांना बोलावून मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ” युवतींचा विकास झाला म्हणजेच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांना श्रद्धांजली लाभली, आणि महिलांसाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल असे समजू असे प्रतिपादन व्यक्त केले. आयोजित कार्यक्रमात विद्यार्थीनिंचा उत्स्फूर्त प्रतिसादा सोबत covid -19 जनजागृती व कृती मोहीम सुद्धा राबविण्यात आली.