युवारंगच्या निशुल्क समर कॅम्पचा नेत्रदीपविणारा समारोप सोहळा संपन्न

404

The गडविश्व
आरमोरी : शहरात युवारंग तर्फे मागील ३ वर्षापासून विद्यार्थ्यांच्या निशुल्क समर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निशुल्क समर कॅम्पचे आयोजन २६ एप्रिल २०२२ ते १४ मे २०२२ पर्यंत करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना कराटे, योगा , फोटोग्राफी, चित्रकला, नृत्यकला, संगीत , संगणक , वन्यजीव व पर्यावरण संवर्धन , शेती, आयुर्वेद व शरीर विज्ञान, क्रीडा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या समर कॅम्पचा समारोप सोहळाशनिवार १४ मे २०२२ ला स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी पार पडला. या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिलजी गिल्डा हे होते तर कार्यक्रमाचे सहउद्घाटक अरमोरीचे सामाजिक विचारवंत मनिषजी राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मानापूरचे प्राचार्य चंदूजी कापकर, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आरमोरी पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे तर प्रमुख अतिथी म्हणून अरमोरीच्या सामाजिक विचारवंत चंदाताई राऊत, उद्योजक मोंटूभाऊ पंजवानी, वडसाचे उद्योजक अशोकजी ठकराणी, युवारंगचे संस्थापक तथा अध्यक्ष राहुलजी जुआरे, मुख्य कराटे प्रशिक्षक राजूजी घाटूरकर, उराडीचे सामाजिक कार्यकर्ते राधेशामजी दडमल उपस्थित होते.

या समारोप सोहळ्यात समाजासाठी व देशासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्यात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले महेशजी डोकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर भारतीय सैन्यात नव्याने रुजू झालेले बादल राजगडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा देऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करणारे आरमोरीचे समाजसेवक उमेशजी पिंपळकर , उराडीचे अंकितजी मोहूर्ले, आरमोरीचे नेपचंद्रजी पेलणे यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या समारोप सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक प्राणिलजी गिल्डा यांनी मार्गदर्शन करताना संबोधले की विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये घेत असलेल्या शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा जीवनात कमी पडणाऱ्या व्यवहारिक मूल्यांना आत्मसात करणे गरजेचे असते तर मनीषजी राऊत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिकवलेल्या नृत्य, वक्तृत्व , वेशभूषा ,कराटे व अन्य कौशल्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थी , पालक व युवारंग परिवार सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन दिपकजी गोंदोळे यांनी तर प्रस्ताविक राहुलजी जुआरे व आभार प्रफुलजी खापरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here