The गडविश्व
अबू धाबी : संयुक्त अरब अमिराती (यूएई)चे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे आज निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज अध्यक्ष शेख खलिफांच्या मृत्यूची बातमी जाहीर केली आहे. शेख खलिफा यांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या काळात सर्व सरकारी कार्यालयावरचे ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून सर्व कार्यालये आणि खासगी कंपन्याही बंद ठेवण्यात येणार आहेत. शेख खलिफा हे गेल्या काही वर्षांपासून आजारपणाशी झुंजत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांच्याकडे यूएईची सूत्र जाण्याची शक्यता आहे. शेख खलिफांच्या मृत्यूनंतर अद्याप यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.