– नागरिक त्रस्त, आजची रात्र अंधारातच काढावी लागण्याची शक्यता
The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : चामोर्शी तालुक्यातील येणापूर परीरात मागील सात तासांपासून बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून तब्बल ३० गावे अंधारात आहेत त्यामुळे सर्वत्र काळोख परसलेला आहे. तर वीज पुरवठा नेमका खंडित कोणत्या ठिकाणावरून झाला हे वीज कर्मचाऱ्यांना अद्यापही न कळल्याने आजची रात्र अंधारातचं काढावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
येणापूर परिसरात आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. ३ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाल्याने काही तासात वीज पुरवठा सुरळीत सुरू होईल अशी आशा नागरिकांना होती मात्र तब्बल सात लोटूनही परिसरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही. दरम्यान परिसरातील वीज कर्मचाऱ्यांनी खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र नेमका वीज पुरवठा कोणत्या ठिकाणाहून खंडीत झाला याचा शोध लागला नसल्याचे कळते. यामुळे येणापूर परिसरातील तब्बल ३० गावे काळोखाच्या अंधारात आहेत. सर्वत्र काळोख परसलेला आहे.
आज पावसाने उसंत घेतली व उन तापले त्यामुळे आज गर्मी चे प्रमाणही वाढले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांपासून नागरिक त्रस्त असतात. ग्रामीण भाग असल्याने रस्त्यांवर रात्रोच्या सुमारास किटक, आदी प्राणी वावरत असतात मात्र वीज पुरवठा खंडित झाला असल्याने त्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे तसेच मोठ्यांपासून, लहान बालके, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती आदींना डासांचा सामना करावा लागत असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.©
#chamorshi #lightoff #yenapur #mseb #gadchiroli