The गडविश्व
गडचिरोली : जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान यांच्या वतीने येनापुर येथे रविद्रभाऊ बंडावार यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त काल २७ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १९ रक्तदात्यांनी सहभाग दर्शविला व रक्तदान केले.
रक्तदान शिबिराला उद्धघाटक म्हणून माजी जि. प. सदस्य गडचिरोली तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे अतुल गण्यारपवार तसेच अध्यक्ष म्हणून ज.ग्रा. वि. बहु. संस्था येनापुर मार्गदर्शक मनमोहन बंडावार , प्रमुख पाहुणे म्हणून शामराव जक्कुलवार, राकेश भंडारवार, सुनीताताई मोहन बंडावार, भगवान संगावार, आमगावचे सरपंच ग्रा.विनोद शेंगर व राजेश ढुमणे, विशाल बंडावार आदी उपस्थित होते.
शिबिरात रक्तदान करणाऱ्यांमध्ये अविनाश विश्वास, आशिष चलाख, नारायण बावणे, लक्ष्मण अंनल, राखलं रॉय, यशवंत सिडाम , शुभम माईंन, स्वप्निल गोर्लावार, मयुर गावडे, मयुर बंडावार , रामकृष्ण झाडे, विकास हेमके, रवींद्र जक्कुलवार , कपिल बंडावार, अविनाश विश्वास, चेतन दिवसे, या सर्वांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नवे व वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता रक्तदाते शोधण्याचा व जनजागृती करण्याचा प्रयत्न. संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे त्याला जिल्यातील नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष वैभव बुरमवार यांच्या मार्गदरशनाखाली आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव लुकेश सोमनकर, रवींद्र बंडावार, रवींद्र जक्कुलवार, प्रशांत गावडे, लहू वेट्टी, आश्विन बंडावार, आयुष दुधे, प्रदीप जक्कुलवार,आकाश बंडावार, तसेच रक्तसंकलन टीम गडचिरोली येथील डॉ. आलाम , समता खोब्रागडे,बंडू कुंभारे, मोहिनी चुटे, मयूर पोलजवार यांचे सहकार्य लाभले.