येरकड आविकात विकलेल्या शेतकऱ्यांच्या बारदानण्याचे पैसे कधी ?

303

– पैसे देण्याची ची निवेदनातुन मागणी   धानोरा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा , १६ सप्टेंबर : तालुक्यातील येरकड येथील आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्थेत शेतकऱ्यानी धान्य विकले. मात्र धान्य विकताना बारदाना परत करु नाहीतर पैसे देवू या तत्वावर शेतकऱ्यांनी बारदाण्यासह धान्य विकले परंतु वर्ष उलटुनही बारदाण्याचे पैसे मिळालेच नसल्याने बारदाण्याच्या  कट्ट्याचे पैसे कधी ? असा सवाल केला जात असून सदर कट्ट्याचे पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी धानोरा व्यवस्थापक उप प्रादेशिक कार्यालय धानोरा यांना निवेदनातुन केली आहे.

धानोरा तालुक्यात एकूण १३आविका आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यापारी लोकांपासुन होणारी फसवणूक थांबावी, शेतकऱ्यांना एकाधिकार चा भाव मिळावा या उद्देशाने तालुक्यात सरकारने धान खरेदी केंद्र सुरु केले. याकरिता बारदानण्याची व्यवस्था शासनच करुण देते. मात्र तालुक्यातील येरकड येथील धान खरेदी केंद्रात खरीप हंगाम २०२१ -२०२२ मधे येथील आदिवासी सेवा सहकारी संस्था मर्यादित येरकडला स्थानिक शेतकऱ्यांनी धान्य विकले . खरेदी  केंद्रावर कट्टे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी मधुकर जगन्नाथ भैसारे १०० कट्टे, सौ.जयवंता मनिराम मडावी ७५ कट्टे, सौ. रखमाबाई चौधरी नरोटे १२५ कट्टे, अशोक नामदेव कोल्हे १२५ कट्टे, शंकर चमारू मडावी १०० कट्टे यांनी खरेदी केंद्राला दिले. परंतु आजपर्यंत त्यांच्या कट्ट्याचे पैसे मिळालेले नाही. सदर कट्ट्याचे पैसे मिळण्याबाबत वारंवार केंद्राला माहिती विचारून शेतकरी थकले परंतु बारदाण्याचे पैसेच मिळाले नाही. हिच परिस्थिती धानोरा तालुक्यातील इतर धान खरेदी केंद्राची आहे. त्यामुळे बारदाण्याचे पैसे खरच मिळत नाही का? कुणाच्या खिशात तर जात नाही ना ?  असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारीत आहेत. तसेच याबाबत कोणीच समाधानकारक उत्तर कधीही दिले नाही त्यामुळे संबंधित कट्ट्याचे पैसे मिळण्याची मागणी येरकड येथील शेतकरी मधुकर जगन्नाथ भैसारे, जयवंता मनिराम मडावी, सौ रखमाबाई चौधरी नरोटे, अशोक नामदेव कोल्हे , शंकर समारू मडावी यांनी धानोरा येथील व्यवस्थापक उपप्रादेशिक कार्यालय धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here